Marathi Language: ज्ञानेश्वर माऊली वर्णन केलेल्या मराठी भाषेला जवळपास 2000 वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. आज केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. हा निर्णय महाराष्ट्रासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्याबाबत मागणी सुरु होती. केंद्र सरकारच्या अख्यत्यारीत या बाबीचा समावेश होता, आणि आता हे स्वप्न सत्यात उतरले आहे. महाराष्ट्रातील अनेक साहित्यिक आणि लेखकांनी याबाबत आनंद व्यक्त केला आहे. भाजप नेत्यांकडूनही यासाठी सतत पाठपुरावा करण्यात आला होता.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने हा निर्णय घेतला आहे, आणि आतापर्यंत अनेक भारतीय भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये याबाबतची तरतूद करण्यात आली आहे.
सध्या देशात तामिळ, तेलुगू, संस्कृत, कन्नड, मल्याळम आणि उडिया या सहा भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला होता. आता यामध्ये मराठी भाषेचा देखील समावेश करण्यात आला आहे.
हे सर्व फायदे मिळाल्याने मराठी भाषेचा विकास होईल आणि तिच्या अभ्यासात व शिक्षणात महत्त्व वाढेल, यामुळे नव्या पिढीसाठी ती अधिक प्रभावशाली बनेल.
अशीच माहिती जनून घेण्यासाठी आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉइन करा, WhatsApp ग्रुप जॉइन करण्यासाठी खालील WhatsApp बटन ला क्लिक करा.